जुनी रेखाचित्रे नव्याने प्रसिद्धीस

By Admin | Updated: November 21, 2015 02:06 IST2015-11-21T02:06:29+5:302015-11-21T02:06:29+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने

Old drawings are newly released | जुनी रेखाचित्रे नव्याने प्रसिद्धीस

जुनी रेखाचित्रे नव्याने प्रसिद्धीस

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीबीआयने हल्लेखोरांची जुनी रेखाचित्रे पुन्हा प्रसिद्धीस दिली आहेत.
काही महिन्यांपूर्वी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मारेकऱ्यांची रेखाचित्रे जारी केली होती. ही रेखाचित्रे मे महिन्यात प्रसिद्धीसही देण्यात आली होती. मात्र त्यातून हाती काही लागले नसल्याने ही रेखाचित्रे सीबीआयने पुन्हा प्रसिद्धीस दिली आहेत. रेखाचित्रांशी साधर्म्य असलेल्या संशयितांबाबत माहिती कळवण्याचे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Old drawings are newly released