माटुंग्यात वृध्देची हत्या

By Admin | Updated: June 8, 2016 03:29 IST2016-06-08T03:29:49+5:302016-06-08T03:29:49+5:30

माटुंग्यात ७८ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचे सोमवारी उघडकीस आले.

Old age murder | माटुंग्यात वृध्देची हत्या

माटुंग्यात वृध्देची हत्या


मुंबई : माटुंग्यात ७८ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचे सोमवारी उघडकीस आले. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमागे ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा व मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.
माटुंगा येथील प्रणव रेसीडेंसीमधील पाचव्या मजल्यावर मंजुला वोरा (७८) या रविवाल (८५) या भावासोबत राहत. तो मानसिक रुग्ण होता. रविलाल यांचे पाय सुजल्याने वोरा यांनी सोमवारी सायंकाळी डॉ. शहा यांच्याशी संपर्क साधून त्यांना घरी बोलावले होते. बराच वेळ बेल वाजवूनही काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यांनी तेथील वॉचमन विचारले. वॉचमनने कॉल केला असता, वोरा घरात असल्याचे सांगून फोन ठेवण्यात आला. त्यामुळे शहा पुन्हा घरात गेले. तेव्हा आरोपीने दरवाजा उघडला. शहांनी वोरा कुठे आहेत असे विचारताच त्या आतमध्ये झोपल्या असल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार शहा यांनी आतमध्ये प्रवेश करतात आरोपीने पळ काढला. वोरा यांच्या बेडरुममध्ये प्रवेश केलेल्या शह यांना त्यांचा रक्ताळलेला मृतदेह आढळला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शहा यांनी केलेल्या वर्णनावरुन आरोपीचे स्केच तयार केरण्यात आले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेच्या हव्यासापोटी ही हत्या झाल्याचा संशय आहे. वोरा राहत असलेली प्रणव रेसीडेन्सी ही इमारत उभी राहण्यापूर्वी जी जुनी इमारत होती ती मंजुळाबेन यांचे पती मणीलाल यांच्या मालकीची होती. २००४ च्या सुमारास या इमारतीचा पुनर्विकास झाला. त्या बदल्यात दीड हजार चौ.फुटाचा फ्लॅट आणि पैसे मंजुलाबेन यांना मिळाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Old age murder