कडब्यासोबत कापल्या ५०० च्या जुन्या नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 21:31 IST2017-02-14T21:31:49+5:302017-02-14T21:31:49+5:30

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे कडबा सोबत ५०० च्या जुन्या नोटांंचे तुकडे कापले गेल्याचा प्रकार समोर आला आहे़ या नोटा कडब्यात कोणी टाकल्या

Old 500's currency cut with curtain | कडब्यासोबत कापल्या ५०० च्या जुन्या नोटा

कडब्यासोबत कापल्या ५०० च्या जुन्या नोटा

 ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 14 -  तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे कडबा सोबत ५०० च्या जुन्या नोटांंचे तुकडे कापले गेल्याचा प्रकार समोर आला आहे़. या नोटा कडब्यात कोणी टाकल्या हे मात्र अद्याप समोर आलेले नाही़. 
चिनोदा येथील शेतकरी पोपट संतोष पाटील यांच्या खळ्यात मंगळवारी सकाळी साठवलेल्या कडब्याची कटाई करण्यासाठी मशिन सुरू करण्यात आले़. चाऱ्याची कटाई सुरू असतानाच मजुरांना अचानक ५०० च्या जुन्या नोटांचे तुकडे दिसून आले. मजुरांनी ही माहिती शेतकरी पोपट पाटील यांना दिली़. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, ५०० च्या जुन्या नोटांचे असंख्य तुकडे चाऱ्यात मिसळल्याचे दिसून आले. ही माहिती गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी खळ्याकडे धाव घेतली़ मात्र तोवर मजुरांनी नोटांचे तुकडे उचलून नेले होते. चाऱ्यासोबत कटाई झालेल्या नोटा साधारण ५० हजार रूपये मूल्याच्या असल्याची माहिती आहे. कटाई झालेल्या नोटा नेमक्या कोणाच्या, कोणी लपवल्या याबाबतच्या चर्चांना गावात ऊत आला आहे. (वार्ताहर)

चाऱ्याची आवश्यकता भासत असल्याने ज्वारीचा कडबा खरेदी केला होता़ या कडब्याची कटाई कटर मशीनद्वारे करण्यात येत असतानाच मजुरांना कडब्याच्याच्या एका गड्डीतून नोटांचे तुकडे येत असल्याचे दिसून आले होते. 
-पोपट संतोष पाटील, शेतकरी,  

Web Title: Old 500's currency cut with curtain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.