शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ओझर विमानतळावर ओल्या पार्टीसाठी अर्ज

By admin | Updated: March 10, 2015 01:42 IST

ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या ओल्या पार्टीप्रकरणी दोषींवर कारवाई होत नसल्याच्या

नाशिक : ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या ओल्या पार्टीप्रकरणी दोषींवर कारवाई होत नसल्याच्या विरोधात सजग नागरिक मंचने उपरोधिक आंदोलन करण्याचे ठरविले आहे. मंचने ओझर विमानतळावर ‘ओली पार्टी’ करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे परवानगी मागितली आहे.मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विमानतळावर झालेल्या पार्टीने मोठा वाद झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन ठेकेदार विलास बिरारी यांना अटक झाली. चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. मात्र मद्यपार्टीला परवानगी देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना ‘विनंती बदली’ देण्यात आली. वादग्रस्त पार्टीला २२ मार्चला ५० दिवस पूर्ण होत असल्याने पुन्हा त्या पार्टीचे सेलेब्रेशन करण्यासाठी पार्टी करण्यास परवानगी देण्याची मागणी सजग नागरिक मंचने केली आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाचे निवडक अधिकारी व ठेकेदारांना या पार्टीला निमंत्रित करणार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आल्याचे संस्थेचे सचिव अ‍ॅड. सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)