ओझर विमानतळावर ओल्या पार्टीसाठी अर्ज
By Admin | Updated: March 10, 2015 01:42 IST2015-03-10T01:42:02+5:302015-03-10T01:42:02+5:30
ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या ओल्या पार्टीप्रकरणी दोषींवर कारवाई होत नसल्याच्या

ओझर विमानतळावर ओल्या पार्टीसाठी अर्ज
नाशिक : ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या ओल्या पार्टीप्रकरणी दोषींवर कारवाई होत नसल्याच्या विरोधात सजग नागरिक मंचने उपरोधिक आंदोलन करण्याचे ठरविले आहे. मंचने ओझर विमानतळावर ‘ओली पार्टी’ करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे परवानगी मागितली आहे.
मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विमानतळावर झालेल्या पार्टीने मोठा वाद झाला होता. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन ठेकेदार विलास बिरारी यांना अटक झाली. चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. मात्र मद्यपार्टीला परवानगी देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना ‘विनंती बदली’ देण्यात आली.
वादग्रस्त पार्टीला २२ मार्चला ५० दिवस पूर्ण होत असल्याने पुन्हा त्या पार्टीचे सेलेब्रेशन करण्यासाठी
पार्टी करण्यास परवानगी देण्याची मागणी सजग नागरिक मंचने केली आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाचे निवडक अधिकारी व ठेकेदारांना या पार्टीला निमंत्रित करणार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आल्याचे संस्थेचे सचिव अॅड. सिद्धार्थ सोनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)