शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अबब..! लोकसभा निवडणुकीच्या काळात तब्बल साडेचार लाख लिटर मद्यसाठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 07:00 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मद्याचा वापर केला जातो....

ठळक मुद्देउत्पादनशुल्क विभागाची कारवाई दीड कोटी रुपयांचा साठा केला जप्त, साडेचारशे जणांवर गुन्हा दाखलजिल्ह्यात सर्वाधिक २४१ गुन्हे शिरुर लोकसभा मतदार संघात

पुणे : राज्य उत्पादनशुल्क विभागाने लोकसभा निवडणूक कालावधीत केलेल्या कारवाईत तब्बल ४ लाख ५९ हजार ९२८ लिटर मद्य साठा आणि मद्य तयार करण्याची रसायने जप्त केली आहेत. या प्रकरणी ४५७ जणांना अटक केली असून, तब्बल १ कोटी ६७ लाख ५२ हजार ९४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मद्याचा वापर केला जातो. त्या पार्श्वभूमीवर उत्पादनशुल्क विभागाने जिल्ह्यातील बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे या चारही लोकसभा मतदारसंघावर अवैध मद्य वाहतूकीवर करडी नजर ठेवली होती. तसेच, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघ निहाय तपासणी मोहीमही राबविली होती. मार्च महिन्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत (दि. २३ मे) ही कारवाई सुरु होती.  जिल्ह्यात सर्वाधिक २४१ गुन्हे शिरुर लोकसभा मतदार संघात असून, त्यातील ११७ गुन्हे शिरुर विधानसभा मतदार संघातील आहेत. सर्वाधिक २७ हजार ३२१ लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली असून, मद्य तयार करण्याचे रसायनाचा तब्बल ४ लाख २४ हजार ८३७ लिटरचा साठा जप्त केला आहे. या शिवाय बीअर, विदेशी मद्य, ताडी, देशी मद्याचा साठा देखील जप्त केला आहे. मद्य वाहतूकीसाठी वापरलेल्या५४ वाहनांसह तब्बल १ कोटी ६७ लाख ५२ हजार ९४८ रुपयांचा साठा जप्त केला आहे. ---बारामती, शिरुरमध्ये सर्वाधिक कारवाईबारामती लोकसभा मतदारसंघात २२५ गुन्हे दाखल असून, १२३ जणांना अटक झाली आहे. हातभट्टी १०, ३८२, रसायन १ लाख ६७ हजार ९००, देशी मद्य ३००, विदेशी मद्य १८२, २४३ लिटर बीअर आणि १२२२ लिटर ताडीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या मतदारसंघातील भोर तालुक्यात सर्वाधिक ८८ गुन्हे दाखल आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघात २४१ गुन्हे दाखल असून, १३३ जणांना अटक झाली आहे. हातभट्टी ९,६४३, रसायन १,७२,३४६, देशी मद्य ४७७, विदेशी मद्य १५६, बिअर ३१७ आणि ताडीचा १,७९९ लिटर साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे मतदारसंघात १३० गुन्हे दाखल असून, त्यातील ५७ गुन्हे  वडगावशेरीत नोंदविण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीFDAएफडीएLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९