अरे देवा ! शाळेने परीक्षेत विचारलं 'विराटची गर्लफ्रेंड कोण ?'

By Admin | Updated: October 17, 2016 14:23 IST2016-10-17T12:55:51+5:302016-10-17T14:23:02+5:30

भिवंडीमधील चाचा नेहरु हिंदी हायस्कूलने वार्षिक परीक्षेत चक्क विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ? असा प्रश्न विचारला

Oh God! The school asked, 'Who is Viratchi girlfriends?' | अरे देवा ! शाळेने परीक्षेत विचारलं 'विराटची गर्लफ्रेंड कोण ?'

अरे देवा ! शाळेने परीक्षेत विचारलं 'विराटची गर्लफ्रेंड कोण ?'

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - शाळेची वार्षिक परीक्षा म्हटलं की मुलांना अभ्यासाचं प्रचंड टेंशन असतं. अभ्यास करताना काय वाचू आणि काय नको ? असं झालेलं असतं. घरच्यांनी तर टीव्ही पाहण्याची सक्त मनाई केलेली असते. कोणता प्रश्न पेपरमध्ये येणार याचा अंदाज लावून अभ्यास चालू असतो. पण भिवंडीतील एका शाळेने असा प्रश्न विचारला जो शिक्षणमंत्र्यांनादेखील सुचला नसता.  हा प्रश्न होता विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ? इतकंच नाही तर त्याला पर्यायही देण्यात आले होते. म्हणजे मुलांनी शालेय अभ्यासासोबत याचाही अभ्यास करावा अशी अपेक्षा शाळेची आहे का काय ? हा पेपर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. चाहते आणि प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी दोघांच्या नात्याची चर्चा झाली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या करिअरपेक्षा अफेअरसाठी जास्त चर्चेत राहिले. मात्र त्यांचे हे अफेअर फक्त क्रिकेट किंवा बॉलिवूडपर्यंत मर्यादित राहिलं नाही. भिवंडीमधील चाचा नेहरु हिंदी हायस्कूलने या अफेअरचे महत्व लक्षात घेता परीक्षेत विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ? असा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर त्याला प्रियांका, अनुष्का आणि दीपिका असे पर्यायही देण्यात आले होते. 
मुलांचं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून प्रयत्न होत असताना हे असले प्रश्न विचारुन डोक्यावरचं ओझं मात्र वाढवायचं काम चालू असलेलं दिसतं आहे.
 

Web Title: Oh God! The school asked, 'Who is Viratchi girlfriends?'