शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 21:19 IST

एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

BJP Girish Mahajan ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतणार असल्याची घोषणा आज खडसे यांनी पत्रकार परिषदेतून केली. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची उत्तर महाराष्ट्रातील ताकद आणखी वाढणार आहे. मात्र त्याचवेळी पक्षांतर्गत गटबाजीतही भर पडणार आहे. कारण खडसे यांचा भाजपचे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते असलेल्या गिरीश महाजनांसोबत मागील काही वर्षांपासून टोकदार राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच आज खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, "खडसेंकडे गावातील ग्रामपंचायतही नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय, विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगीही पराभूत झाली आहे, बँकची सत्ताही गेली, आता त्यांच्याकडे काय राहिले आहे?  जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता?" असा सवाल महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये करणार असल्याची घोषणा केलेली असतानाही गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केल्याने आगामी काळात जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

भाजप प्रवेशाबद्दल बोलताना काय म्हणाले एकनाथ खडसे?

"माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली  आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी आज दिली आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४