'शिववडा पाव'वर कारवाई करणा-या अधिकाऱ्याला फासलं काळं

By Admin | Updated: December 23, 2016 12:54 IST2016-12-23T12:54:47+5:302016-12-23T12:54:47+5:30

शिववडापावच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळे फासण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

The officer who took action against 'Shivavda Pav' | 'शिववडा पाव'वर कारवाई करणा-या अधिकाऱ्याला फासलं काळं

'शिववडा पाव'वर कारवाई करणा-या अधिकाऱ्याला फासलं काळं

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 23 - शिववडापावच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळे फासण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळे फासले आहे. या महापालिका अधिका-याचे नाव अरुण वानखेडे असून शिवसेना चर्मकार सेनेचे अध्यक्ष शामराव क्षीरसागरने वानखेडे यांना काळं फासले. 
 
दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेविरोधात संताप व्यक्त करत मनपा कर्मचा-यांनी क्षीरसागराला कार्यालयातच कोंडून ठेवलं. यानंतर मनपा कर्मचा-यांनी त्याला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे महापालिकेत काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. 
 

Web Title: The officer who took action against 'Shivavda Pav'