शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

अधिकाऱ्याकडून सहकारी तरुणीचा विनयभंग

By admin | Updated: August 15, 2016 05:04 IST

एका कॉर्पोरेट कंपनीतील लक्ष्मण मांगेल (४१) या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीशी गैरवर्तन करून विनयभंग केला.

ठाणे : नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत एका कॉर्पोरेट कंपनीतील लक्ष्मण मांगेल (४१) या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ सहकारी तरुणीशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तिने मोठ्या धाडसाने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आता हा गुन्हा ठाणेनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.ठाणे पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील ‘टाटा एआयए’ या कंपनीत ही तरुणी नोकरीला असून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याच कंपनीत व्यवस्थापक असल्याचा गैरफायदा घेत लक्ष्मण मांगेल याने तिच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी लगट करण्याचाही प्रयत्न केला. महत्त्वाच्या मीटिंगसाठी बोलवून एका रूममध्ये तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंगही केला. एवढ्यावरही न थांबता तिला अश्लील लघुसंदेश (एसएमएस) पाठवून पुन्हा विनयभंग केला. या प्रकाराला विरोध केल्यास कामावरून काढून टाकण्याची तसेच कुटुंबाला ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली. १४ आॅगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नौपाडा पोलीस ठाण्यातून हे प्रकरण ठाणेनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्यामुळे यातील कथित आरोपी लक्ष्मणला अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुषमा वायदंडे या याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)> कंपनी व्यवस्थापकाचा प्रताप‘टाटा एआयए’ या कंपनीत ही तरुणी नोकरीला असून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याच कंपनीत व्यवस्थापक असलेल्या लक्ष्मण मांगेल याने हे कृत्य केले.