मुलीचे आक्षेपार्ह फोटो: तिघांवर गुन्हा

By Admin | Updated: July 12, 2017 04:55 IST2017-07-12T04:55:36+5:302017-07-12T04:55:36+5:30

कळव्यातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर टाकणाऱ्या तिच्या मित्रांसह तिघांविरुद्ध कळवा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.

Offensive photo of the girl: crime against three | मुलीचे आक्षेपार्ह फोटो: तिघांवर गुन्हा

मुलीचे आक्षेपार्ह फोटो: तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळव्यातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर टाकणाऱ्या तिच्या मित्रांसह तिघांविरुद्ध कळवा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
१९ वर्षीय पीडित मुलीची भांडुप (पूर्व) येथील राकेश प्रदीप सिंग याच्याशी मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत, राकेशने तिच्यासोबतचे काही आक्षेपार्ह फोटो शिवगणेश ग्रुप, कळवा ग्रुप, खतरनाक ग्रुप इत्यादी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप्सवर पाठवले. या प्रकरणी पीडित मुलीने कळवा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुशल रामचंद्र यादव आणि आलकेश सिंग या त्याच्या आणखी दोन मित्रांचाही यामध्ये सहभाग असून, राकेशने आपणास मोबाइल फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून कळवा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offensive photo of the girl: crime against three