विद्यार्थ्यांना मलेशियाला पाठवणाऱ्यावर गुन्हा
By Admin | Updated: August 1, 2014 04:25 IST2014-08-01T04:25:32+5:302014-08-01T04:25:32+5:30
थील शेल हॉस्पिटॅलिटी अॅकॅडमी प्रा.लि. येथील १९ विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावर मलेशिया येथे पाठवून

विद्यार्थ्यांना मलेशियाला पाठवणाऱ्यावर गुन्हा
ठाणे : येथील शेल हॉस्पिटॅलिटी अॅकॅडमी प्रा.लि. येथील १९ विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावर मलेशिया येथे पाठवून तेथे काम करण्यासाठी आवश्यक व्हिसा देणाऱ्या तसेच त्याच अॅकॅडमीतील आणखी ३४ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकरीसाठी मलेशिया व सिंगापूरला पाठवतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ३० रुपये घेणाऱ्या सिद्धेश देशमुख याच्याविरोधात संस्थेचे विश्वस्त मिलिंद कोळी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देशमुख हा मलेशियातून मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून २०१२मध्ये कोळी यांच्या संस्थेत आला होता. याचदरम्यान त्याने तेथील १९ विद्यार्थ्यांना टुरिस्ट व्हिसावर मलेशिया येथे नेऊन कामाचा व्हिसा मिळवून दिला नसल्याने ते तेथेच अडकून राहिले आहेत. तसेच त्याने आणखी ३४ मुलांना चांगल्या पगाराची नोकरी मलेशिया आणि सिंगापूर येथे मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ३० हजार रुपये घेऊन पोबारा केला.
हा प्रकार २०१२ ते २०१४ दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पसार देशमुख याचा
शोध सुरू असून, त्याला दिलेले पैसे त्याने कोणत्या बँकेत जमा केले, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती
पोलीस निरीक्षक आर.आर. चव्हाण यांनी
दिली. (प्रतिनिधी)