औरंगाबादेत ‘ओढणी गँग’ सक्रिय
By Admin | Updated: May 25, 2016 01:49 IST2016-05-25T01:49:30+5:302016-05-25T01:49:30+5:30
येथील बन्सीलालनगरातील दुकान फोडणाऱ्या महिलांच्या ओढणी गँगने रविवारी रात्री मोंढ्यात आणखी तीन दुकाने फोडले. एका दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात ही ‘ओढणी गँग’ कैद झाली.

औरंगाबादेत ‘ओढणी गँग’ सक्रिय
औरंगाबाद : येथील बन्सीलालनगरातील दुकान फोडणाऱ्या महिलांच्या ओढणी गँगने रविवारी रात्री मोंढ्यात आणखी तीन दुकाने फोडले. एका दुकानातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात ही ‘ओढणी गँग’ कैद झाली. या टोळीने तीन दुकानांमधून ५६ हजार ७०० रुपयांचा ऐवज लांबविला.
महिला चोरांच्या टोळीने रविवारी रात्री बन्सीलालनगरातील पंकज अरोरा यांचे पहाटे दुकान फोडून साडेसहा हजारांची रोकड पळविली होती. अरोरा यांच्या दुकानातील ‘सीसीटीव्ही’त ही संपूर्ण
घटना नोंद झाली होती. रविवारी रात्री महिला चोरांच्या टोळीने मोंढ्यातील लक्ष्मण चावडी रस्त्यावरही धुमाकूळ घातला.
चोरीची अजब तऱ्हा
‘ओढणी गँग’ने राज्यातील इतर शहरांत सुद्धा धुमाकूळ घातला आहे. मुंबई, नागपूर, नाशिकसारख्या शहरात ही गँग सक्रिय आहे. या गँगची चोरी करण्याची पद्धत पुरुष चोरांनाही लाजवणारी आहे. चोरी करण्यापूर्वी भागाची रेकी केली जाते.
दुकानाच्या शटरजवळ गँगच्या महिला ठाण मांडतात. कुलपावर
ओढणी टाकतात. कुलूप तोडल्यानंतर एखादी सडपातळ मुलगी आत जाईल, एवढेच शटर उचकटले जाते.
मुलीजवळ कटर, करवत, चाकू अशी शस्त्रे असतात. त्याद्वारे लॉकर तोडून रोख रक्कम व मुद्देमाल लांबविला जातो. मुलगी दुकानाबाहेर येईपर्यंत टोळीतील सदस्य
शटर पूर्ववत करून ओढणीने
कुलूप झाकून घेतात. (प्रतिनिधी)