शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही ऑक्टोबर महिना सरला 'हिट'विना, आता राज्यात थंडीची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 20:40 IST

जमिनीतील ओलावा आणि ढगाळ वातावरण यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही आॅक्टोबर हिट जाणवलाच नाही.

ठळक मुद्देपुण्यात शनिवारी ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

पुणे : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास लांबल्याने आॅक्टोबर महिन्यात यंदा सातत्याने पावसाचा अनुभव आला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. जमिनीतील ओलावा आणि ढगाळ वातावरण यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही आॅक्टोबर हिट जाणवलाच नाही. २८ आॅक्टोबरला देशभरातून मॉन्सूनने एक्झिट घेतल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली असून रात्रीच्या तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मराठवाडा व कोकणातील काही ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा घट होण्यास सुरुवात झाली आहे.१ नोव्हेंबर रोजी कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात शनिवारी कमाल तापमान३१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअसाची नोंद झाली आहे. कमाल तापमान अधिक असले तरी किमान तापमानात सरासरीपेक्षा १़२ अंश सेल्सिअसने घट झाली आहे़ पुढील ३ दिवस कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३१ आणि १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन