राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र
By Admin | Updated: October 4, 2014 01:44 IST2014-10-04T01:44:15+5:302014-10-04T01:44:15+5:30
तापमानात आज पुन्हा वाढ झाल्याने राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्याचे तापमान आज 38 अंशांच्या घरात पोहोचले.

राज्यात ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र
>पुणो : तापमानात आज पुन्हा वाढ झाल्याने राज्यात ऑक्टोबर हिटच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राज्याचे तापमान आज 38 अंशांच्या घरात पोहोचले. ऐन निवडणुकीच्या काळात सूर्य आग ओकू लागल्याने उमेदवारांसह कार्यकत्र्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
आज राज्यात सर्वाधिक 37.5 अंश सेल्सिअस तापमान अकोल्यामध्ये नोंदविले गेले. विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या तापमानात प्रामुख्याने वाढ झाली आहे. खान्देश
आणि कोकणातील काही शहरांचे तापमानही 36 अंशाच्या घरात पोहोचले आहे.
कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उकाडा जाणवत असल्याचे चित्र राज्यात बहुतांशी ठिकाणी आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.
दोन दिवसांपूर्वी राज्यात सक्रिय झालेला मॉन्सून पुन्हा गायब झाला आहे. पुढील 48 तासांत राज्यात कोठेही जोरदार पावसाची शक्यता नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणो वेधशाळेने
वर्तविली आहे.(प्रतिनिधी)
पुण्याचे तापमान 35 अंशांर्पयत वाढले
ऑक्टोबर महिना सुरू होऊन 2 दिवसच झालेले असताना
पुणोकरांना ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा बसू लागल्या आहेत. आज शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आणि ते 34.7 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यामुळे घराबाहेर पडताच पुणोकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. मात्र पुढील 24 तासांत शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तापमानात थोडी घट होईल, असा अंदाज पुणो वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरातून अजून पावसाळा संपला नसला तरी पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर तो पुन्हा गायब झाला. त्यामुळे शहराच्या तापमानात वाढ झाली. सप्टेंबरच्या अखेर्पयत 33 अंशाच्या आत असलेल्या शहराच्या तापमानाने आज मोठी उसळी घेतली.
दस:याच्या सुट्टीनिमित्त आज देवदर्शनासाठी आणि खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या पुणोकरांची ‘ऑक्टोबर हिट’ने मात्र चांगलीच दमछाक केली. उन्हात फिरताना महिला-मुलांना त्रस होत असल्याचे चित्र शहरात होते.
पुढील 24 तासांत शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 अंशाच्या घरात राहील, असा अंदाज पुणो वेधशाळेने वर्तविला आहे.