प्रचारापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, उद्धव ठाकरेंची भाजपावर पुन्हा टीका
By Admin | Updated: May 21, 2017 22:31 IST2017-05-21T22:31:09+5:302017-05-21T22:31:45+5:30
गल्लीबोळात जाऊन प्रचार करण्यापेक्षा तुमचे काम नीट पार पाडा, म्हणजे प्रचार करण्याची गरज पडणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

प्रचारापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, उद्धव ठाकरेंची भाजपावर पुन्हा टीका
ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. 21 - गल्लीबोळात जाऊन प्रचार करण्यापेक्षा तुमचे काम नीट पार पाडा, म्हणजे प्रचार करण्याची गरज पडणार नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे आज कामोठे येथे आले होते.
या प्रचारसभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी भाजपाविरोधात आपल्या विरोधाची धार पुन्हा एकदा तीव्र केली. गल्लीबोळात प्रचार करण्यापेक्षा पंतप्रधानांनी देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे, तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याचा विचार करायला हवा, असे ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव यांनी नोटाबंदीच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले. नोटाबंदीमुळे देशाच्या परिस्थितीत काहीही बदललेली नसल्याचे ते म्हणाले. येथे मी पनवेल महानगरपालिका जिंकण्यासाठी आलो आहे. आता जे काही मागायचे आहे ते जनतेकडे मागेन भाजपाकडे नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
https://www.facebook.com/Shivsena/videos/10154288490807030/