शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

ओबीसींचे राजकीय आरक्षण, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 06:55 IST

मुख्यमंत्र्यांनी बोलविली आज बैठक

मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या बुधवारच्या निकालानंतरही लांबणीवर पडाव्यात यासाठी शेवटची धडपड म्हणून राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी बोलाविली आहे.

राज्य सरकारने ११ मार्च २०२२ रोजी कायद्याची अधिसूचना काढून प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. त्या आड निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारची रणनीती होती. ओबीसी आरक्षण नाही तर निवडणुका नाहीत, अशी भूमिका सरकारने घेतली होती. विरोधी पक्ष भाजपनेही त्यास समर्थन दिले होते. मात्र, बुधवारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

निवडणुका कधीही घेतल्या तरी शिवसेनेची तयारी आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून राज्य सरकार पुढची पावले उचलेल.ॲड. अनिल परब, सांसदीय कामकाज मंत्री.आजच्या निकालाने राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, हीच राज्य सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे सरकारला बंधनकारक आहे. नेमका आदेश काय आहे ते तपासूनच पुढे जाऊ.जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतील. सरकारची पुढची दिशा या बैठकीत निश्चित केली जाईल. छगन भुजबळ, ज्येष्ठ मंत्री व ओबीसी नेते.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असला तरी ऐन पावसाळ्यात निवडणुका घेणे व्यवहार्य नाही. ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका ठरविताना मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यामुळे सरकारला दोष देता येणार नाही. बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते. 

हे तर सरकारचे पूर्णत: अपयश : फडणवीससर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा राज्य सरकारच्या अपयशाचा परिपाक आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, ट्रिपल टेस्ट करून ओबीसींना आरक्षण द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगूनही महाविकास आघाडी सरकारने पावले उचलली नाहीत. निव्वळ टाइमपास केला. आजच्या निकालाने आरक्षण गेल्यामुळे ओबीसींचे अपरिमित नुकसान झाले आहे; आणि त्यास राज्य सरकारच जबाबदार आहे. राज्य सरकारने केलेला कायदा न्यायालयाने रद्दबातल ठरविलेला नाही; मात्र, राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले आहेत.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयOBC Reservationओबीसी आरक्षण