शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क अभियानात भाजपाच्या रडारवर ओबीसीच्या ३८४ जाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 00:26 IST

ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले.

मुंबई : ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. या निर्णयांचा पूर्ण फायदा उचलण्यासाठी प्रदेश ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व ३८४ जातींपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपाने चालवली आहे.भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सध्या राज्यभर संवाद से संपर्क अभियान सुरू आहे. या अंतर्गत मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, काँग्रेसने ४० वर्षे ओबीसी समाजावर अन्याय केला. समाजाला घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ४० वर्षांपासून खितपत पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. या निर्णयाचा ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे. ओबीसींचे वाढते संघटन भाजपासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे राज्यातील ३८४ जातींपैकी आपल्या शहरात असलेल्या जातींचे नेते, जातसमूहांच्या संघटना आणि त्यांच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचायला हवे. भाजपा सरकारने ओबीसी समाजासाठी केलेले काम त्यांच्यापर्यंत पोहोचवतानाच या जातींच्या समस्या आणि मागण्याही जाणून घ्याव्यात. भविष्यात या मागण्यांबाबत सरकार पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे विजय चौधरी म्हणाले.ओबीसी प्रवर्गात मोडणाºया प्रवर्गातील जातींचे संघटन भाजपाच्या हिताचे असले तरी या वर्गाला भाजपाशी जोडणे आवश्यक आहे. ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून या प्रत्येक संघटनेपर्यंत पोहोचायला हवे. स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने बुथ स्तरापर्यंत ओबीसी मोर्चा आणि त्यातून जोडल्या जाणाºया कार्यकर्त्यांचे संघटन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ओबीसी मोर्चाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात संवाद से संपर्क अभियानाची सुरुवात केली आहे. आता मुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमांनंतर कोकणात अभियान सुरू करण्यात येईल.भायखळा येथील सावित्रीबाई फुले शाळेच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यास मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यासह ओबीसी मोर्चाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कोकणातही अभियानमुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमांनंतर कोकणात संवाद से संपर्क अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र