शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ELection: ऑक्टोबरपूर्वी निवडणुका नाहीच; निवडणूक आयोग जाणार सुप्रीम काेर्टात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 06:20 IST

१४ महापालिकांची प्रभाग रचना १७ मेपर्यंत जाहीर होईल. नंतर तेथे आरक्षण व मतदार याद्या अंतिम करणे ही कार्यवाही होईल. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबरपूर्वी घेता येणार नाहीत, अशी भूमिका निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासहनिवडणूक व्हावी यासाठी उत्सुक असलेल्या राज्य सरकारला त्यासाठीच्या प्रयत्नांकरिता पुरेसा अवधी मिळणार आहे. 

 सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार आयोगाने कुठली कार्यवाही आठवडाभरात केली याची माहिती दिली जाईल. निवडणुकीसाठीची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत आयोग पूर्ण करेल. त्यानंतर प्रभाग/गणांचे आरक्षण व मतदार याद्यांना अंतिम स्वरूप देणे यासाठी किमान २० दिवस लागतील. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस असेल आणि त्या परिस्थितीत निवडणुका घेणे शक्य होणार नाही, अशी भूमिका आयोगाच्या वतीने न्यायालयात मांडली जाईल. १४ महापालिकांची प्रभाग रचना १७ मेपर्यंत जाहीर होईल. नंतर तेथे आरक्षण व मतदार याद्या अंतिम करणे ही कार्यवाही होईल. 

पण पावसाळा आडवा येणार असल्याने महापालिका निवडणुकाही ऑक्टोबरच्या आधी होणार नाहीत असे चित्र आहे. २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची गण रचना २७ जुलैपर्यंत अंतिम करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकाचवेळी घेता येणार नाहीत. त्या दोन टप्प्यांत घेण्याची भूमिकाही आयोगातर्फे मांडली जाईल, अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. 

मुख्यमंत्री करणार शिवराज चौहान यांच्याशी चर्चा‘आपण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करा,’ असे छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सुचविले. ठाकरे यांनी ते मान्य केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयOBC Reservationओबीसी आरक्षण