शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीआधी आरक्षण; राज्य सरकारची रणनीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 05:27 IST

निवडणूक आयाेगाशी चर्चा करणार, असल्याची माहिती. 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व प्रवर्गांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला किमान दोन महिने लागणार आहेत. हे लक्षात घेता त्या आधी माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित आयोगाकडून ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा डेटा घेऊन सर्वोच्च न्यायालयापुढे जायचे आणि ओबीसी आरक्षण टिकवायचे, अशी रणनीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

सर्वोच्च न्यायालयाने  प्रभाग रचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला दिलेले असले तरी, हे अधिकार स्वत:कडे घेणारा राज्य सरकारचा कायदा अवैध ठरविलेला नाही किंवा त्याला स्थगितीदेखील दिलेली नाही. ‘इम्पिरिकल डेटा’च्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्याचा पर्याय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. 

चर्चेनंतरच स्पष्ट भूमिका

  • वडेट्टीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अजूनही गोंधळाची स्थिती आहे. 
  • मुख्यमंत्री ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे येत्या दोन दिवसांत घटनातज्ज्ञांशी चर्चा करून त्या बाबतची स्पष्टता घेतील. 
  • ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, हीच राज्य सरकारची भूमिका असेल. 
  • बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, वडेट्टीवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते.  

निवडणूक आयाेगाशी चर्चा करणार 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, हे समजून घेण्यासाठी राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आयोगाशी एक-दोन दिवसांत चर्चा करणार आहेत. 

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष निवडणूक घेण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे आयोगाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
  • मध्य प्रदेशमधील ओबीसी आरक्षणाची केस सर्वोच्च न्यायालयात असून, त्यावर शुक्रवारी निकाल अपेक्षित आहे. या निकालाचीही उत्सुकता आहे. 

युद्धपातळीवर काम‘इम्पिरिकल डेटा’च्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्याच्या पर्यायाचा आधार राज्य सरकार घेईल आणि सर्वोच्च न्यायालयापुढे लवकरात लवकर हा डेटा सादर करेल. हा डेटा तयार करण्याचे काम जयंतकुमार बांठिया आयोग युद्धपातळीवर करीत आहे, असे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा जो कायदा राज्य सरकारने केलेला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविलेला नाही. त्यामुळे कालच्या निकालाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही.    विजय वडेट्टीवार,मंत्री, बहुजन कल्याण विभाग

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही. ओबीसी आरक्षण वाचविण्याचा प्रत्येक प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करेल.छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयOBC Reservationओबीसी आरक्षण