नान्नज गाव डिजिटलच्या दिशेने
By Admin | Updated: January 1, 2017 03:15 IST2017-01-01T03:15:03+5:302017-01-01T03:15:03+5:30
सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज हे गाव़ माळढोक अभयारण्यासाठी ओळखले जाणारे हे गाव सेवासुविधांपासून परिपूर्ण

नान्नज गाव डिजिटलच्या दिशेने
सोलापूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज हे गाव़ माळढोक अभयारण्यासाठी ओळखले जाणारे हे गाव सेवासुविधांपासून परिपूर्ण आहे़. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गावातील व्यवहार डिजिटल, आॅनलाइन पेमेंट व कॅशलेस व्यवहारासाठी आता पुढे येऊ लागले आहे़ गावात अनेक लहान-मोठी दुकाने आहेत़ या दुकानात आता स्वॅप, पेटीएमचा वापर वाढत आहे़ शिवाय चेकद्वारे देवाण-घेवाणीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत.नान्नज हे द्राक्षपिकांसाठी प्रसिद्ध आहे़ त्यामुळे द्राक्ष बागायतदारही आपला व्यवहार करीत असताना आॅनलाइन पेमेंट व चेकचा वापर करीत आहे़ त्यामुळे नान्नज हे डिजिटलच्या दिशेने जात आहे़
गाव : नान्नज
एकूण बँकांची संख्या : ३
पोस्ट आॅफिस : होय
एटीएमची संख्या : ०१
वाहतूक सुविधा : एसटी, सोलापूर महानगरपालिकेची बससेवा, खासगी वाहतूक
स्मार्टफोन धारक :
५ हजारांपेक्षा जास्त
साक्षरतेचे प्रमाण : ७० टक्के
इंटरनेट सुविधा : बीएसएनएल; शिवाय विविध कंपन्यांचे टॉवर
वीजपुरवठा : सुरळीत आहे; चार तास भारनियमन
कॅशलेस आणि
डिजिटल व्यवहार :
विजेचे, फोन, डिश टीव्हीचे
बिल भरण्यासाठी आॅनलाइन बँकिंग; ३० टक्के लोक
कॅशलेस व्यवहार करतात.
चलनात बदल होणे अपेक्षितच होते़ यापूर्वीदेखील असे पाऊल उचलले गेले असते तर व्यवहारातील बनावट नोटांचे प्रमाण कमी झाले असते. कदाचित त्यावर पूर्णपणे अंकुश लागला असता. तसेच कॅशलेस व्यवहारही तेव्हाच अमलात आला असता़ भ्रष्टाचारही थांबला असता़ डिजिटल इंडियात पेपरलेसप्रमाणे कॅशलेस व्यवहार वेगाने व्हावे़ युवकांचा याकडे कल वाढलेला दिसून येतोय़
- युसूफ छप्परबंद
नोटा बदलाचा या काळात चांगला फायदा होतोय़ यामुळे सर्वसामान्यांना बचतीचे आणि कॅशलेसचे महत्त्व कळाले़ आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या देशात भविष्यात जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस व्हायला हवेत़ उच्चशिक्षित महिलांना पुढे जाण्यास मदत होणार आहे़ पैसे चोरीचे धोके पूर्णत: कमी होणार आहेत़ कॅशलेसमुळे बिनधास्त आणि सुरक्षित खरेदीचा सुखद अनुभव घेतोय़
- अश्विनी इंगळे
अनेक खासगी बँकांची गुंतवणूक मुक्त अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून झालेली आहे़ पंपावर गेलो असता शंभर रुपयांच्या पेट्रोलवर सेवाकर किंंवा अन्य प्रकारचा ६ रुपये कर लागतोय़ आता या काळात तो बंद असला तरी तो इतर काळात लागणारच आहे़ यामुळे कॅशलेस व्यवहार जरूर वाढेल़ परंतु शंभर रुपयांमागे ६ रुपये खूपच होतात़ याचा फायदा परदेशी गुंतवणूकदारांना होतोय़ कॅशलेस नकोच़
- अपर्णा पटणे
सर्वसामान्यांपैकी सर्वच व्यक्ती कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत़ आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा देश आजही शंभर टक्के स्वयंपूर्ण वाटत नाही़ संगणकाच्या युगात निरक्षरांचीही संख्या मोठी आहे़ कॅशलेसऐवजी चलन तुटवडा दूर करून आर्थिक घडी पूर्वपदावर आणावी़ सर्वसामान्यांना ही प्रणाली परवडणारी नाही़ पुढे जाऊन मनमानी करीत कंपन्या आपला सेवाकर वाढवतील़
- चिंतामणी पवार
सरकारने सावधपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित आहे़ एकीकडे पैशांची चोरी थांबेल, बँकिंग व्यवहार वाढतील़ परंतु याचा दुसरा फटका म्हणजे आॅनलाइन व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार वाढतील़ अकाउंट हॅकर्सचेही प्रमाण वाढणार आहे़ कॅशलेस व्यवहार काळाची गरज आहे, जरूर वाढवा, परंतु हॅकर्स, गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात कडक कायदेही करायला हवेत़
- बन्सी वडरे