शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

होडी वल्हवित दुर्गम भागात पोहचवला पोषण आहार, सातपुड्याच्या Relubai Vasave यांची धाडसी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 07:58 IST

Relubai Vasave: कोरोनाच्या काळात अंगणवाड्या बंद असल्याने कार्यक्षेत्रातील कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांची या सेविकेने खऱ्या अर्थाने सेवा केली.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात कधी डोंगर उतारावर पायपीट करून, तर कधी नर्मदेच्या पाण्यात होडी वल्हवित कुपोषित बालकांना आहार पुरविणाऱ्या चिमलखेडी (ता. अक्कलकुवा) येथील अंगणवाडी सेविका रेलूबाई वसावे यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. कोरोनाच्या काळात अंगणवाड्या बंद असल्याने कार्यक्षेत्रातील कुपोषित बालके, गरोदर आणि स्तनदा मातांची या सेविकेने खऱ्या अर्थाने सेवा केली.

चिमलखेडी हे सातपुड्यातील दुर्गम भागातील नर्मदा काठावरील ६६३ लोकवस्तीचे गाव. ते सात पाड्यांत विभागले आहे. सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात हे गाव असल्याने सातपैकी तीन पाड्यांना टापूचे स्वरूप आले आहे. तेथे नर्मदेच्या पाण्यातून होडीने अथवा बार्जने जाण्याचा एकच पर्याय. इतरही पाडे साधारणत: अंगणवाडी केंद्रापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहेत. या अंगणवाडीत शून्य ते सहा वयोगटातील १३९ बालके, १५ गरोदर माता, सात स्तनदा माता आणि ४७ किशोरी आहेत. कोरोनामुळे अंगणवाड्या बंदच असल्याने शासनाने घरपोच पोषण आहार देण्याची योजना सुरू केली होती. त्यामुळे येथे प्रत्येक बालकाच्या घरी आहार पोहोचविणे एक आव्हान होते; पण अंत:करणापासून कर्तव्याची व सेवेची जाण असल्यास कितीही अवघड काम सहज सोपे आणि आनंदाचे होते, हे येथील अंगणवाडी सेविका रेलूबाई वसावे या रणरागिणीने आपल्या कृतीतून सिद्ध केले. गेले वर्षभर त्यांनी चिमलखेडी गावातील अलिबागपाडा, डाबरपाडा आणि पिऱ्याबारपाडा या पाड्यांवर स्वत: होडी वल्हवित पोषण आहार नेऊन बालकांच्या व इतर लाभार्थींच्या घरोघरी पोहोचविला. हे काम करताना दोन-तीन वेळा त्यांच्या जीवावरही बेतले होते. इतरही चार पाड्यांवर डोंगर उताराच्या रस्त्यांवर तीन ते चार किलोमीटर पायपीट करीत आहार पोहोचविला.  कौतुकाची थापसकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत नित्यनियमाने त्यांचे हेच काम सुरू होते. सोनीबाई बिज्या वसावे या मदतनीसची त्यांना साथ होती. मात्र, सध्या  मदतनीस सेवानिवृत्त झाल्याने आता हा भार त्यांच्या एकट्यावर आला आहे. या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन तसेच विधिमंडळाच्या महिला बालकल्याण समितीनेही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीMaharashtraमहाराष्ट्र