परिचारिकांची परदेश वारी सुकर
By Admin | Updated: July 12, 2017 05:28 IST2017-07-12T05:28:01+5:302017-07-12T05:28:01+5:30
परराष्ट्र मंत्रालयाने परदेशात भारतीय परिचारिकांना नोकरी देण्याकरिताचे प्रमाणपत्र दिले आहे.

परिचारिकांची परदेश वारी सुकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटनेला नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने परदेशात भारतीय परिचारिकांना नोकरी देण्याकरिताचे प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे दलालांना आळा बसेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. शिवाय, भारतीय परिचारिकांना परेदशात नोकरी करण्याचा मार्ग अधिक पारदर्शी व सुकर झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
भारतीय परिचारिकांच्या आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक हितासाठी ही संघटना कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या संघटनेकडे दलालांविरोधात तक्रारी येत होत्या. याला आळा घालण्यास संघटनेने हे सकारात्मक पाऊल उचलल्याचे संघटनेच्या महासचिव एवलिन पी कन्नन यांनी सांगितले.