अजिंठा लेणीला येणा-या पर्यटकांची संख्या रोडावली

By Admin | Updated: January 31, 2015 05:00 IST2015-01-31T05:00:56+5:302015-01-31T05:00:56+5:30

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली असल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा

The number of tourists coming to the Ajanta cave shrieked | अजिंठा लेणीला येणा-या पर्यटकांची संख्या रोडावली

अजिंठा लेणीला येणा-या पर्यटकांची संख्या रोडावली

श्यामकुमार पुरे/शिवाजी महाकाळ ल्ल अजिंठा/फर्दापूर (जि़ औरंगाबाद)
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली असल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १९ हजार भारतीय, तर ४०० विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे़
दरवर्षी अजिंठा लेणीला येणाऱ्या पर्यटकांमध्ये साधारण नऊ टक्क्यांची वाढ होते. मात्र, यंदा ही वाढ तर झालीच नाही, उलट पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
याशिवाय कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने फर्दापूर टी पॉइंटवर अभ्यागत केंद्र सुरू केले. अजिंठा लेणीतील क्रमांक १, २, १६, १७ क्रमांकाच्या लेणीच्या प्रतिकृती येथे तयार करण्यात आलेल्या आहेत. या अभ्यागत केंद्राचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी करण्यात आले होते. मात्र, पर्यटकच येत नसल्याने सध्या ते ओस पडले आहे.
मोफत प्रवेश तरीही केंद्र ओस
अभ्यागत केंद्रात आॅक्टोबरपासून पर्यटकांना मोफत प्रवेश सुरू करण्यात आला आहे. अजिंठा लेणीला २०१३ आणि २०१४ मध्ये जवळपास ८ लाख १० हजार ६०० पर्यटक आले. या तुलनेत अभ्यागत केंद्रात आॅक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१४ पर्यंत केवळ ३ लाख ५० हजार पर्यटकांनी हजेरी लावली.

Web Title: The number of tourists coming to the Ajanta cave shrieked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.