वाहनतळांची संख्या वाढणार

By Admin | Updated: March 6, 2017 02:38 IST2017-03-06T02:38:30+5:302017-03-06T02:38:30+5:30

मुंबईत वर्षागणिक वाहनांची संख्या वाढत असताना केवळ ९२ वाहनतळ उपलब्ध आहेत.

The number of parking lots will increase | वाहनतळांची संख्या वाढणार

वाहनतळांची संख्या वाढणार


मुंबई : मुंबईत वर्षागणिक वाहनांची संख्या वाढत असताना केवळ ९२ वाहनतळ उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या बिकट झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अखेर महापालिकेने वाहनतळांची संख्या तीनशेवर नेण्याची तयारी केली आहे. नवीन वाहनतळ उभारण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत प्राथमिक कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी मासिक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
शहराच्या मध्यवर्ती तसेच रहदारी असणाऱ्या भागात महापालिकेने वाहनतळ निश्चित केले आहे. परंतु काही जागांवर खासगी संस्था, आस्थापनांनी कब्जा केला आहे. रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांवरही वाहने उभी केली जातात. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे़ वाहतूक कोंडीची समस्याही वाढली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मुंबईत रस्त्यांवर ९२ आणि रस्त्याव्यतिरिक्त २९ ठिकाणी वाहनतळे आहेत. मात्र ही वाहनतळे अपुरी पडू लागल्याने रस्त्यांवरील वाहनतळांची संख्या ९२वरून ३००पर्यंत वाढविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The number of parking lots will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.