म.रेवरील वैद्यकीय कक्षांची संख्या वाढणार
By Admin | Updated: March 6, 2017 05:02 IST2017-03-06T05:02:32+5:302017-03-06T05:02:32+5:30
रेल्वे स्थानकातील जखमी प्रवाशांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्लॅटफॉर्ममध्ये आपात्कालिन वैद्यकीय कक्ष मध्य रेल्वेकडून उभारले जात

म.रेवरील वैद्यकीय कक्षांची संख्या वाढणार
मुंबई : रेल्वे स्थानकातील जखमी प्रवाशांना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्लॅटफॉर्ममध्ये आपात्कालिन वैद्यकीय कक्ष मध्य रेल्वेकडून उभारले जात आहे. सध्या दहा स्थानकांवर ही सेवा उपलब्ध असताना, आणखी २२ स्थानकांवर सेवा देण्यात येईल.
या स्थानकांमध्ये कुर्ला, घाटकोपर, वडाळा, दादर, मुलुंड, कर्जत, पनवेल, वाशी, भायखळा, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन, विक्रोळी, कसारा, कळवा, मुंब्रा, अंबरनाथ, मानखुर्द, भांडुप, टिटवाळा, उल्हासनगर, गोवंडी, चेंबूर या स्थानकांचा समावेश आहे.