आता फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करायचा का?
By Admin | Updated: November 20, 2014 02:45 IST2014-11-20T02:45:18+5:302014-11-20T02:45:18+5:30
विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत.

आता फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करायचा का?
मुंबई : विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायचा काय, असा सवाल शिवसेनेचे विधान परिषद सदस्य रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना दर एकरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, कर्जवसुली थांबवावी, वीजजोडणी तोडू नये, पीक विम्याचे पैसे तत्काळ द्यावे अशा मागण्या केल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी सध्या आत्महत्या करीत असून गेल्या १० महिन्यांत ३५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. शिष्टमंडळात दिवाकर रावते, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)