शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:58 IST

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 'लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडन्यूज दिली आहे...

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केला आहे. यातील 'लाडकी बहिण' योजना सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या योजनेसंदर्भात महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसत आहे. योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायलाही सुरुवात झाली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. यातच आता, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 'लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडन्यूज दिली आहे. ते नागपूर येथे बांधकाम कामगार मेळाव्यात बोलत होते.फडणवीस म्हणाले, "आपल्या सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करणे सुरू झाले आहे. यावेळी फडणवीस यांनी, किती लोकांच्या खात्यात पैसै आले? असा प्रश्न करत उपस्थित महिलांना हात वर करायलाही सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर हात वर झाले. यानंतर, फडणवीस म्हणाले, आता काळजी करू नका, परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत. कारण, सर्व लाडक्या बहिणींना आता आम्हाला दिवाळीत भाऊबिजेची ओवाळणी द्यायची आहे. ती ओवाळणी आम्ही अॅडव्हाॉन्समध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत.

फडणवीस यांनी दिली 'लेक लाडकी' योजनेची माहिती -फडणवीस पुढे म्हणाले, "आपण लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली, तर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहीजे आणि जन्माला आलेली मुलगी, तिने घराला लखपती बनवायला हवे, म्हणून आपण लेक लाडकी योजना सुरू केली. मुलगी जन्माला आल्याबरोबर, 5 हजार रुपये, ती पहिल्या वर्गात गेल्याबरोबर, 5 हजार रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7 हजार रुपये. ती सातव्या वर्गात गेली  की 7 हजार रुपये. ती 11 व्या वर्गात गेली की 8 हजार रुपये आणि ती 18व्या वर्षी 75 हजार रुपये, म्हणजे एकूण एक लाख रुपये मुलगी जन्माला येईल त्या घरामध्ये, त्या मुलीच्या नावाने आपण देत आहोत. जेणेकरून त्या मुलीच्या जन्माचे स्वागत व्हायला हवे." 

मुलींना ग्रॅज्यूएशनपर्यंतचे शिक्षण मोफत -"आपल्याला कल्पना आहे की, आपल्या सरकारने निर्णय घेतला की, मुलींचे शिक्षण 12 वी पर्यंत मोफत होते. मात्र, पुढचं शिक्षण मोफत नव्हतं. आता आपण निर्णय घेतला आहे की, पहिलीपासून ते गॅज्यूएशनपर्यंत मुलिंचे संपूर्ण शिक्षण मोफत होईल. त्यांची संपूर्ण फीस राज्य सरकार भरेल. इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, बीबीए असो, जवळपास 507 कोर्सेसमध्ये दोन लाख, तीन लाख, जी काही फीस असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कारण आमच्या लक्षात आले की, अनेक वेळा खासगी महाविद्यालयात अॅडमिशन मिळते की मग घरचे लोक विचार करता, एक मुगला आणि एक मुलगी असेल तर मुलाला शिकवू का? कसा तरी  पोटाला चिमटा घेऊन. यानंतर मुलीला सांगतात की, तुझ्या भावाला शिकवण्याचे पैसे आमच्याकडे आहेत, तुला काही बाई आम्ही शिकवू शकत नाही. त्यामुळे तू आपलं काही छोटं मोठं शीक आणि लग्न करून चालली जा. त्यामुळे आम्ही निर्णय केला की ठीक आहे, आई-वडिलांकडे पैसे नसतील, पण मुलींचे लाडके मामा राज्यात बसलेले आहेत. ते मुलींची फीस भरतील आणि आपण मुलींची संपूर्ण फी भरणे आता या ठिकाणी सुरू केले आहे." अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. 

याशिवाय, महिलांसाठी 50 टक्के एसटीचे कन्सेशन दिले आहे. त्यांनीही प्रवास सुरू केला आहे. परिणामी एवढ्या महिलांनी प्रवास सुरू केला की, तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली, असेही फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाWomenमहिला