आता तृप्ती देसाई देणार दारूबंदीसाठी लढा
By Admin | Updated: May 16, 2016 15:18 IST2016-05-16T15:17:23+5:302016-05-16T15:18:59+5:30
शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर मंदिरातील महिला प्रवेशाचा लढा यशस्वी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आता दारूबंदीसाठी आंदोलन करणार आहेत.

आता तृप्ती देसाई देणार दारूबंदीसाठी लढा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर मंदिरातील महिला प्रवेशाचा लढा यशस्वी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आता दारूबंदीसाठी आंदोलन करणार आहेत. देसाई संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जनतेला दारूबंदीचे आवाहन करणार आहेत. तसेच याप्रश्नी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर व कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर गेल्या आठवड़्यात त्यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करुन दर्शन घेतले. मात्र त्यांना मजारमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
या आंदोलनांनंतर त्यांनी दारूबंदीसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Activist Trupti Desai to travel across Maharashtra asking for a ban on liquor, will meet Maharashtra CM Devendra Fadnavis in this regard too
— ANI (@ANI_news) May 16, 2016