शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"आता शिवसेनेनं सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात", उद्धव ठाकरेंसोबतच्या ज्येष्ठ नेत्यानं केली मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 13:40 IST

Anant Gite: शिवसेनेत दोन गट पडून अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले माजी खासदार अनंत गीते यांनी स्वबळाबाबत मोठं विधान केलं आहे.

रत्नागिरी - उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून हिंदुत्वाच्या पुन्हा भाजपाशी युती करावी, अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडी सोडण्यावरून पक्षात फूट पडली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान, शिवसेनेत दोन गट पडून अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले माजी खासदार अनंत गीते यांनी स्वबळाबाबत मोठं विधान केलं आहे.

यापुढे शिवसेनेनं सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असं मत अनंत गीते यांनी मांडलं आहे. रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गीते म्हणाले की,   प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. तसा माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. माझं मत आहे की, यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरं जावं. माझी खात्री आहे की उभा महाराष्ट्र शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, असं गीता यांनी सांगितलं. 

शिंदे गटाच्या मागणीशी माझ्या मताचा संबंध नाही, असंही गीते यांनी यावेळी स्पष्ट केलं. स्वबळाची मागणी करण्यासाठी बेईमानी करण्याची गरज आहे का, गद्दारी करण्याची गरज आहे का, बापाला नालायक म्हणण्याची गरज आहे का, आईला विकण्याची गरज आहे का, काही गरज नाही. शिंदे गटाला या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही अनंत गीते यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, रत्नागिरीमध्ये ८० टक्के कुणबी समाज हा शिवसेनेसोबत होता, आताही आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. आता गीते यांच्या मताबाबत शिवसेना नेतृत्व काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnant Geeteअनंत गीते