आता रस्ते घोटाळ्याचा श्रेयवाद

By Admin | Updated: April 26, 2016 06:15 IST2016-04-26T06:15:26+5:302016-04-26T06:15:26+5:30

रस्ते घोटाळा उघड केल्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये आता घमासान सुरू झाले आहे.

Now thanks to the road scam | आता रस्ते घोटाळ्याचा श्रेयवाद

आता रस्ते घोटाळ्याचा श्रेयवाद

मुंबई : रस्ते घोटाळा उघड केल्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये आता घमासान सुरू झाले आहे. चौकशीची मागणी करून अडचणीत आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी हा अहवाल उजेडात येताच अपुऱ्या माहितीच्या आधारेश्रेय घेण्याचा प्रयत्न केला़ तर शिवसेनेचे शिलेदार संभ्रमात असल्याचा फायदा उठवत भाजपाने बाजी मारल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता असल्याची तक्रार करून महापौर आंबेकर यांनी स्वपक्षीयांची नाराजी ओढावून घेतली होती़ मात्र विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर शिवसेनेने या चौकशीचा अहवाल महापौरांकडे सादर होण्यासाठी पालिकेची महासभा तहकूब केली़ प्रत्यक्षात या चौकशीचा अहवाल आज महापौरांकडे सादर झाल्यानंतर त्याची पुरेशी माहितीही त्या पत्रकारांना देऊ शकल्या नाहीत़ (प्रतिनिधी)

Web Title: Now thanks to the road scam