आता ठाणे पोलिसही टिवटरवर

By Admin | Updated: May 1, 2016 11:13 IST2016-05-01T10:58:48+5:302016-05-01T11:13:09+5:30

मुंबई, नवी मुंबई पोलिसांपाठोपाठ ठाणे पोलिसांनीही त्यांचे टि्वटर हँण्डल सुरु केले आहे.

Now Thane police also on Twitter | आता ठाणे पोलिसही टिवटरवर

आता ठाणे पोलिसही टिवटरवर

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. १ - मुंबई, नवी मुंबई पोलिसांपाठोपाठ ठाणे पोलिसांनीही त्यांचे टि्वटर हँण्डल सुरु केले आहे. रविवारी एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलिसांच्या टि्वटर अकाऊंटचा शुभारंभ केला. 
 
ठाणे पोलिसांच्या टि्वटर आणि फेसबुकचे अकाऊंटची जबाबदारी ठाणे पोलिसांची महिला टीम संभाळणार आहे. महिला पोलिसांना यासाठी प्रशिक्षित करण्यात आले असून, रविवारपासून ठाणे पोलिसांच्या सोशल मिडीयाची जबाबदारी महिलांकडे असेल. 
 
एक एपीआय आणि पाच कॉन्स्टेबल या टीममध्ये असतील. सुरुवातीला स्वतंत्र सोशल मिडीया तज्ञ त्यांना मदत करतील. ठाण्याच्या साकेत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पोलिसांचे संचलन झाले. 
 
 

Web Title: Now Thane police also on Twitter