शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; विनोद घोसाळकरांच्या मुलावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 21:27 IST

Firing on Abhishek Gosalkar news: अभिषेक घोसाळकर यांना दोन ते तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती

ShivSena News: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर अनोळखी व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:लावर गोळ्या झाडून घेतल्या, ज्यामुळे त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना  करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड केली. अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती असून दहिसर पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मॉरिस हा आमच्या भागातील ज्ञात गुन्हेगार होता आणि तो सर्व राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. युबीटीमध्येही तो शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्ही त्याला रोखले. त्यांचा आणि अभिषेक घोसाळकरमध्ये वाद झाला आणि नंतर पॅचअपही झाले. गुरुवारी मॉरिस यांनी त्यांच्या कार्यालयात साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. त्यांच्यात वाद होऊन मोरीस केनीने अभिषेक यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केल्याचे शिवसैनिकांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाFiringगोळीबारAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर