शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:08 IST

Anil Parab on Raj Thacekray: १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, यावरून ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशही दिले आहेत. यामुळे ठाकरे गट शिवसेना एकाचवेळी मनसे, शिंदे गट शिवसेना यांच्याशी दोन हात करणार आहे. शिंदे गटाने अख्खी शिवसेनाच फोडून नेल्याने आधीच अडचणीत असलेल्या ठाकरेंना आता आधी फुटलेल्या मनसेविरोधातही लढावे लागणार आहे. याची सुरुवात शिवतीर्थावरील सभेची तारीख बुक करण्यावरून झाली आहे. 

१७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, यावरून ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. राज ठाकरेंनी मागील सभांमध्ये मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही, असे स्पष्ट केले होते. मग लोकसभेचा उमेदवार नसताना, लोकसभा लढवत नसताना आता कोणाची पोरं कडेवर खेळवणार आहात असा सवाल ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी केला आहे. 

राज ठाकरे शिवतीर्थावर आता कोणाची सभा घेणार आहेत, असा सवाल परब यांनी केला आहे.  दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला आहे. सगळे काही रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाही. आम्हाला आमची पोरं आहेत, असे सांगत परब यांनी राज ठाकरेंना डिवचले आहे. तसेच शिवतीर्तावर सभा घेता आली नाही तर आम्ही बीकेसी किंवा अन्य मैदानांचा विचार करू, असे परब म्हणाले आहेत. 

तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला आता किरीट सोमय्या यांनी स्टार प्रचारक म्हणून यावे, अशी खोचक टीका परब यानी केली. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४