शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

डाळिंब उत्पादक होणार निर्यातदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:37 AM

पुढचे पाऊल : शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे.

- नितीन काळेल (सातारा)

डाळिंबातून चांगले  पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा तयार करतात. मात्र शेतकऱ्यांना कमी, तर व्यापाऱ्यांनाच जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहणार आहेत. 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहेत. मात्र हे डाळिंब व्यापाऱ्याच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांची कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असतील तर त्याच्या अटी काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करावयाचे झाल्यास त्याचे वजन २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंशी असणेही गरजेचे आहे, असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब पाठविली जातात. त्याची वाहतूक पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हाच यामागील उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी