शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

आता जन्मदाखल्यासोबत मिळणार पालकांना झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 13:09 IST

जलशक्ती अभियान : सोलापूर शहरातील २७० कूपनलिकांचे पुनर्भरण, महापालिका, जीवन प्राधिकरण करणार काम

ठळक मुद्देकेंद्र शासनाने पाणीटंचाई असलेल्या भागात मृद व जलसंधारण उपाययोजना करण्यासाठी जलशक्ती अभियान सुरू केले१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणारजलसंरक्षण, पारंपरिक आणि इतर पाणी स्रोत नूतनीकरण, कूपनलिका पुनर्भरण, वनीकरण आदी कार्यक्रमांचा समावेश

राकेश कदमसोलापूर : केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानातून महापालिका आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील २७० ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग व कूपनलिकांचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. जन्मदाखल्यासोबत पालकांना झाडांची भेट देण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

केंद्र शासनाने पाणीटंचाई असलेल्या भागात मृद व जलसंधारण उपाययोजना करण्यासाठी जलशक्ती अभियान सुरू केले आहे. या अभियानात सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका या अभियानात सहभागी आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

यात जलसंरक्षण, पारंपरिक आणि इतर पाणी स्रोत नूतनीकरण, कूपनलिका पुनर्भरण, वनीकरण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. महापालिकेने शहरातील २७० इमारती आणि कूपनलिकांची माहिती जीवन प्राधिकरणाकडे दिली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग करून या कूपनलिकांचे पुनर्भरण करण्यात येईल. अमृत योजनेतील ६१ लाख रुपयांचा निधी या कामांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. जीवन प्राधिकरणाकडून या कामाची निविदा काढण्यात येणार आहे. महापालिकाही या निविदेच्या प्रतीक्षेत आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी याच आठवड्यात ही निविदा काढण्याबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. 

मुलांसोबत झाडांनाही सांभाळा - जन्मदाखल घेण्यासाठी येणाºया पालकांना दाखल्यासोबत एक झाड भेट देण्याचे नियोजन सुरू आहे. पालकांनी आपल्या मुलाप्रमाणेच या झाडाचेही संगोपन करावे. हवे तर या झाडांना त्यांनी नावेही द्यावी, पण आपल्या शहराच्या भविष्यासाठी या झाडांचे संगोपन करावे, अशी यामागची भावना आहे. लवकरच या उपक्रमाला सुरुवात होईल, असेही मायकलवार यांनी सांगितले. 

छतावर पडणारे पाणी अडविणे - राज्य सरकारच्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत शहरात ३० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्याची निविदा काढण्यात आली होती. परंतु, एकही मक्तेदार यासाठी पात्र ठरला नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे मायकलवार यांनी सांगितले. 

या ठिकाणी होणार काम - शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, शासकीय इमारती, मॉल, शाळेच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम करण्यात येईल. बुद्धविहार, मरिआई मंदिर, हनुमान मंदिर, मशीद, तालीम, खंडोबा मंदिर, मलकारसिद्ध मंदिर, दर्गाह अशा २७० ठिकाणांची यादी महापालिकेने जीवन प्राधिकरणाला दिली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater shortageपाणीकपातagricultureशेती