शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

"...आता पंत छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत"; संजय राऊतांची राजघराण्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 08:07 IST

संजय राऊतांच्या राजघराण्यावरील टीकेवर साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी संताप व्यक्त करत राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सातारा - भाजपाने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत साताऱ्यात नेमणूका करू लागलेत. हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानी गादी आहे असं विधान करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार छ. उदयराजने भोसले, आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, प्रतापसिंह महाराजांनी स्वाभिमानासाठी ब्रिटिशांसमोर जो त्याग केलेला आहे. ते झुकले नाहीत आणि ते वंशज आहेत त्यांनी भाजपासोबत जी तडजोड केली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल इतिहासाला कदापि मान्य होणार नाही असं म्हटलं आहे. संजय राऊतांच्या राजघराण्यावरील टीकेवर साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी संताप व्यक्त करत राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे?खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यास राज्यात कोणीही महत्त्व देत नाही. साताऱ्याच्या छत्रपती घराण्याबाबत कळवळा दाखवण्यापूर्वी त्यांनी या घराण्याबाबत आपली अगोदरची वक्तव्येदेखील आठवावीत. छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागताना अन् कोल्हापूरच्या संभाजीराजे यांना दिलेला शब्द फिरवून तिकीट नाकारताना राजघराण्याबद्दलचा आदर कुठे गेला होता? त्यांना छत्रपती घराण्याबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला. 

राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा  काहींचा स्वभावच विकृत असतो. परंतु, या विकृतीची जेव्हा वाढ होते, त्यावेळी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. तुमचा उरला सुरला पक्ष वाढवण्यासाठी जरूर काम करावे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. 

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, राऊत यांना महत्त्व देत नाही. अशा प्रवृत्ती व्यक्तिकेंद्रित आहेत. परंतु, त्यांनी मोजून-मापून वक्तव्य केले पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवरच आज भारत सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. दुसयावर शिंतोडे उडवले म्हणजे तुम्ही फारमोठे होता असे नाही. लोकांना एकत्र ठेवणे महत्त्वाचे असते. तोडफोड करायला जास्त अक्कल लागत नाही. लोकशाही मानता, मग जाती-धर्मात का मतभेद आहेत? ज्यांच्यावर टीका केली. त्यांच्याच मांडीला मांडी लावून का बसता? विकृत लोक सत्तेत राहण्यासाठी काहीही गरळ ओकत असून, ही निर्लज्जपणाची हद्द असल्याची टीका खा. उदयनराजेंनी केली.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेBJPभाजपा