आता व्यवहारात येणार एक हजाराची नवी नोट
By Admin | Updated: February 21, 2017 17:31 IST2017-02-21T17:31:44+5:302017-02-21T17:31:44+5:30
500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती

आता व्यवहारात येणार एक हजाराची नवी नोट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. दरम्यान, चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही नव्या स्वरुपात लवकरच व्यवहारात येणार आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयने एक हजार रुपयाच्या नव्या नोटांची छापाई सुरु केली आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये एक हजार रुपयांची नोट चलनात आणली जाईल. तिचे स्वरूप आणि आकार बदललेला असेल. तसेच वेळोवेळी इतर नोटाही नव्या सिरिजमध्ये नवनव्या स्वरूपात चलनात आणल्या जातील
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर 2016 रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचे सांगितले होते. काळ्या पैशाला आळा बसण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे नोटाबंदीनंतर भाजपा सरकारकडून सांगण्यात आले होते. नोटाबंदीनंतर एटीएम आणि बँकेसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तर रांगेमध्ये काही नागरिकांचा बळी गेला होता.