शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार!

By यदू जोशी | Updated: January 14, 2025 07:44 IST

महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार असून त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आला आहे. महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत. 

आमदारांना या संवादाची उत्सुकता आहेच, पण आता त्यांना मोदींच्या क्लाससाठी काय तयारी करून ठेवायची आहे, या संबंधीचे एक पत्र देण्यात आले आहे. हे पत्र बघितल्यानंतर आमदार जरा धास्तावलेदेखील आहेत. विशेषतः कुठली तयारी करून यायचे आहे यासंबंधी पत्रात सूचना करण्यात आल्या असून आता सगळे आमदार त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना या सूचना केल्या आहेत.

इतके बहुमत कसे मिळाले? महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. आपल्या मते या यशाची कारणे कोणती? हे पंतप्रधान मोदी आमदारांकडून जाणून घेण्याची शक्यता आहे. अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने काय काय केले, त्याचा राज्याला किती फायदा झाला?

केंद्र आणि राज्याच्या योजनांची अंमलबजावणी कशी करता? -  आपण आमदार म्हणून मतदारसंघात काय करत आहात, आता काय करणार आहात याची संक्षिप्त टिपणी तयार करून ठेवायला आमदारांना सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनी काही अचानक विचारले तर तुमची तयारी असली पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची २ अंमलबजावणी तुमच्या मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे होत आहे याचा अहवालही तयार ठेवायला सांगितले आहे.

- राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाचा २ अंमलबजावणी तुमच्या मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे होत आहे याचा अहवालही तयार ठेवायला सांगितले आहे.

- तसेच, मतदारसंघातील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थीची सध्याची सामाजिक, आर्थिक स्थिती काय आहे, या योजनांमुळे त्यांच्या जीवनात काय परिवर्तन आले याची माहितीही द्यायला सांगण्यात आले आहे, अशी माहिती महायुतीच्या एका आमदाराने 'लोकमत'ला दिली. 

मतदारांशी संपर्क करता काय? मतदारसंघात मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता, जनसंपर्काची पद्धत काय आहे? आपला मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचे पुढील पाच वर्षांसाठीचे आपले व्हिजन काय आहे याची माहितीदेखील आमदारांना तयार ठेवायला सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र