शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन समृद्धीसाठी राज्यात आता ‘जलनायक’, देशातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:55 IST

राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.   

संदीप मानकर

अमरावती :  राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  यशदा (पुणे), वाल्मी (औरंगाबाद), डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रबोधनी (अमरावती) आणि वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी (चंद्रपूर) यांना विभागीय पातळीवरील जलसाक्षरता केंद्रांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विविध स्तरांवर प्रशिक्षण देण्याचा व जलक्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या प्रशिक्षकांना जलनायक असे संबोधण्यात येते.  त्यांची संख्या  राज्यस्तरावर  ३४ ,  विभागस्तरावर प्रत्येकी ८ असे ४८, जिल्हास्तरावर प्रत्येकी १० असे ३४०, तालुकास्तरावर १२ असे २६८ तालुक्यांत ३२२४  अशी राहणार आहे.

जिल्हा समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जलदूत, जलप्रेमी व जलकर्मी यांचीही निवड करण्यात येईल. संख्येत आवश्यकतेनुसार बदल करणे, विविध स्तरांवरील जलनायकांची कार्यकक्षा निश्चित करणे, त्यांच्या निवडीचे निकष, निवडीची कार्यवाही जलसाक्षरता केंद्रांमार्फत करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आहेत. यशदा स्तरावरील जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष उपमहासंचालक (यशदा), जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर तालुका समितीचे अध्यक्ष तहसीलदार राहणार आहेत. जिल्ह्यात १४० पदांसाठी निवड अमरावती जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग जलनायकांची निवड करणार  आहे. जलसाक्षरता केंद्र यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणेमार्फत जलकर्मी (सेवेतील तांत्रिक अधिकारी),  जिल्हा आणि तालुकास्तरीय जलनायकांची निवड करण्याचे अनुषंगाने जलनायक जलप्रेमी (जिल्हास्तर) एकूण १० पदे व जलनायक जलदूत (तालुकास्तर) प्रत्येकी  १० प्रमाणे या पदांकरिता कुठलेही मानधन न घेता स्वयंस्फूर्तीने  काम करण्यास इच्छुक असणाºया पात्र उमेदवारांकडून  १ ते १५  नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहे.  शासनाचा हा महत्त्वाचा  उपक्रम असून, यामध्ये लोकांना पाण्याची बचत व महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभर जलनायकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  - प्रमोद पोटफोडे,  कार्यकारी अभियंता,ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती. 

 जलनायकांचे कार्य - ग्रामस्तरावरील जलसेवकाला मार्गदर्शन करणे. जलकर्मींना मार्गदर्शन करणे. जलजागृती करणे.

टॅग्स :Waterपाणी