शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

“… आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:38 IST

सभेवरून भाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला

आगामी १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं. शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. यावरून आता भाजपनं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत प्रचंड मोठी सभा घेणार आहेत म्हणे. त्याची जोरदार जाहिरातबाजीही सुरू करण्यात आलीय. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव कराविशी वाटली. त्यात आणखी खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी यायलाय पाहिजे असं आमंत्रणही देताहेत. पण तुच्याकडे खरं हिंदुत्व राहिलंय कुठे?,” असा सवाल भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.“ते शिवसेनाप्रमुखांच्या काळात होतं. पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून ते हिंदुत्व कधीच सोडलंय. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनाप्रमुख आणि हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून त्या हिंदुत्वावरील हक्क तुम्ही गमावून बसलाय. आता उरलीय ती केवळ सत्ता राखण्यापुरतीची अगतिकता. गेल्या अडीच वर्षांत पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या, रझा अकादमीच्य गुंडांनी केलेला हिंसाचार आणि आता गाजत असलेल्या भोंग्यांच्या विषयात ती वारंवार दिसलीय. त्यामुळे आता तुम्ही कसला हिंदुत्वाचा हुंकार ऐकवणार, आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण. त्यातून तुम्ही कसला हिंदुत्त्ववादी विचार मांडणार? आणि तो कोण ऐकणार?,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र