आता संतापाला पूर्णविराम देण्याची वेळ - शरद पवार

By Admin | Updated: October 9, 2016 19:20 IST2016-10-09T19:20:38+5:302016-10-09T19:20:38+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं आहे.

Now it is time to stop the agony - Sharad Pawar | आता संतापाला पूर्णविराम देण्याची वेळ - शरद पवार

आता संतापाला पूर्णविराम देण्याची वेळ - शरद पवार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सकाळपासून तळेगाव परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच प्रकरणाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील घटनेला जबाबदार घटकाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. आम्ही या संबंधी लवकरात लवकर चार्जशीट भरून आरोपीला कठोर शिक्षा करू, अशी भूमिका सरकारने घेतली आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
पवार म्हणाले, शेवटी सरकारकडून याच अपेक्षा असतात. त्या आता पूर्ण झाल्या आहेत. संताप मी समजू शकतो.

मात्र आता कारवाई झाल्यानंतर संतापाला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. आंदोलनाला काही वेगळे गालबोट लागणार नाही, याची खबरदारी आम्ही घ्यायला हवी, असं म्हणत आंदोलकांना शरद पवार यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

Web Title: Now it is time to stop the agony - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.