शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतोद पदावरून विधान परिषदेत तिढा; शिंदेंकडून बाजोरिया, ठाकरेंकडून पोतनीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:21 IST

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार विधिमंडळात एकच शिवसेना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधान परिषदेतील प्रतोद पदावरून शिवसेना आणि ठाकरे गटाने आपापली नावे दिल्याने विधिमंडळासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विप्लव बाजोरिया तर ठाकरे गटाकडून विलास पोतनीसांचे नाव देण्यात आले आहे. अंतिम निर्णय हा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाच घ्यायचा आहे. विधान परिषदेतील ठाकरे गटाची संख्या अधिक असली तरी व्हिप नेमण्याचा अधिकार हा विधिमंडळातील पक्षनेत्याचा असल्याने नेमका निर्णय कोणाचा ऐकायचा, यासाठी प्रधान सचिवांकडून कायदे-नियमांचा काथ्याकूट सुरू आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार विधिमंडळात एकच शिवसेना आहे. आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना ही सध्या एकनाथ शिंदेंची आहे. असे असले तरी आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटातून आव्हान देण्यात आले आहे. त्यावर निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार आणि त्याआधी उपसभापतींना निर्णय घ्यावा लागल्यास त्या कोणाच्या बाजूने निर्णय घेणार, हा खरा पेचप्रसंग आहे. 

नियम काय सांगतो?विधिमंडळातील गटनेत्याला प्रतोद नेमण्याचा अधिकार असतो. त्यानुसार शिवसेनेचे गटनेते हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याकडून विप्लव बाजोरिया यांची नियुक्ती करण्याचे पत्र देण्यात आले आहे. दुसरीकडे अध्यक्ष निवड होण्याआधी ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. तर पक्षनेते ते स्वत: आहेत. त्यामुळे कुणाचे पत्र मानायचे याबाबत नियम तपासले जात आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेVidhan Parishadविधान परिषदShiv Senaशिवसेना