आता सर्वांचेच विजयाचे दावे

By Admin | Updated: October 16, 2014 04:32 IST2014-10-16T04:32:53+5:302014-10-16T04:32:53+5:30

सेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने त्याचा फायदा रायगडात शेतकरी कामगार पक्षाला

Now everyone's winning claims | आता सर्वांचेच विजयाचे दावे

आता सर्वांचेच विजयाचे दावे

सेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने त्याचा फायदा रायगडात शेतकरी कामगार पक्षाला होऊन अलिबागमध्ये पंडित पाटील, पेणमध्ये धैर्यशील पाटील, उरणमध्ये विवेक पाटील तर पनवेलमध्ये बाळाराम पाटील विजयी होणार, असा दावा शेकापचा आहे. पनवेलमध्ये प्रशांत ठाकुरच येणार असा आत्मविश्वस भाजपाचा आहे. तर दुसरीकडे, पनवेल काँग्रेसचेच असून तेथे आर.सी.घरत विजयी होणार, असा काँग्रेसजनांचा दावा आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपले पुतणे अवधुत तटकरे यांना विजयी करण्याकरिता पणाला लावलेली प्रतिष्ठा फळास येणार असे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे रविंद्र रामजी मुंढे यांनी दिलेली लढत जोरदार आहे, परिणामी येथे सेनेलाच यश मिळÞणार असा विश्वास शिवसेनेचा आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे हनुमंत पिंगळे यांच्यातच खरी लढत झाली. पिंगळे यांचे पारडे जड असल्याचे येथे सांगितले जात आहे. महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांच्याशी काँग्रेसचे माणिक जगताप यांची कडवी झुंज झाली. मतदानाच्यावेळÞी राष्ट्रवादीने जगताप यांना सहकार्य केल्याची चर्चाहोती. तरी पुन्हा गोगावलेच विजयी होणार असा दावा सेनेचा आहे.

Web Title: Now everyone's winning claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.