शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात, संपाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 05:40 IST

अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्याची मागणी.

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  विलीनीकरणाच्या मागणीसह इतर मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा सुरक्षा रक्षक संघटनेने दिला आहे. 

माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर वाघमारे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून अनेक संघटना सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहेत. तरी मंडळातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही, असेच वागत आहेत. अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे. महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक यंत्रणा एकत्रित कराव्या, जेणेकरून शासनाचा अंकुश सर्व जागी राहील. 

‘प्रतीक्षा यादीतील सुरक्षा रक्षकांना नोकरी द्या’रायगड व पुणे जिल्ह्यात भरती करण्यात आली होती, तसेच इतर सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना आस्थापणेने बेरोजगार केले आहे. जे आता वेटिंग लिस्टवर आहेत अशा सुरक्षा रक्षकांना मंडळाने इएसआयसी कडील बेरोजगार भत्ता मिळवून द्यावा आणि तत्काळ नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष  प्रसाद मोरे यांनी  केली.

महाराष्ट्र शासनात मंडळांचे विलीनीकरण होईपर्यंत मंडळाकडून गणवेश आणि इतर असेम्बली साहित्यासाठी निविदा काढण्यात येतात. त्या निविदा घेणाऱ्या कंपन्या सुरक्षा रक्षकांना उच्च दर्जाचे गणवेश, असेम्बली देण्यास असमर्थन दिसत असल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून त्यावर लेव्हीमधील टक्केवारी प्रमाणे खर्च होणारी रक्कम सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यात जमा करावी. जो सुरक्षा रक्षक गणवेश आणि इतर गोष्टी नित्यनेमाने आणि व्यवस्थित परिधान करत नसेल त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून जनमाणसात मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची प्रतिमा चांगली दिसेल आणि मंडळाकडे आस्थापना नोंदी वाढतील. - अभिलाष डावरे, संघटनेचे कार्याध्यक्ष.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र