शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता शिस्तभंगाची नोटीस ई-मेल, व्हॉट्सॲपवर; राज्य सरकारने मार्गदर्शन सूचना केल्या जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:02 IST

प्रशासकीय एकूणच कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी उचललं पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य शासनाच्या विविध विभागांमधील कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात केल्या जाणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईत आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार शिस्तभंगाची नोटीस आता ई-मेल आणि व्हॉट्सॲपद्वारे पाठवता येणार असून सोमवारी शासनाने त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

प्रशासकीय एकूणच कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी तसेच खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने शिस्तभंगविषयक कारवाईत प्राधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांशी होणाऱ्या पत्रव्यवहारासाठी ई-मेल आणि व्हॉट्सॲप माध्यमांचा वापर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सध्या शिस्तभंगाच्या कारवाईसंदर्भात संबंधित पत्रव्यवहार (उदा. दोषारोपाचे ज्ञापन, चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल) व्यक्तिशः किंवा नोंदणीकृत डाकने पाठवला जातो.  मात्र, बऱ्याच वेळा प्रचलित पद्धतीने केला जाणारा हा पत्रव्यवहार वेळेत संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कारवाईसंदर्भातील ही कागदपत्रे जलदगतीने संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

परिपत्रकात काय म्हटले?

  • शासकीय कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित असल्यास, शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने संबंधित कागदपत्रे, पत्रव्यवहार त्याला व्यक्तिशः द्यावा किंवा त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत देण्याची व्यवस्था करावी आणि त्याची पोच घ्यावी. 
  • संबंधित कर्मचाऱ्यास नोंदणी डाकेने कागदपत्रे, पत्रव्यवहार पाठवावा.  या दोन्ही माध्यमांद्वारे प्राप्त झालेली पोच प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवणे बंधनकारक आहे. 
  • कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यास पुरेसा वेळ मिळावा यासाठी सेवेतील कर्मचाऱ्यांना शासकीय ई-मेल आयडीवर, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर कागदपत्रे पाठवावीत.  संबंधित कर्मचाऱ्याने
  • त्याच माध्यमातून कागदपत्रे मिळाल्याची पोच द्यावी. 
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवरही कागदपत्रे बजावता येतील.  संबंधित कर्मचाऱ्याने व्हॉट्सॲपवर कागदपत्रे मिळाल्याची पोच देणे आवश्यक राहील.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप