शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता मध्य रेल्वे होणार हागणदारीमुक्त; मध्य रेल्वेच्या साडेपाच हजार बोगीत ‘बायोटॉयलेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 10:20 IST

रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे.

- महेश चेमटे मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने जुलै महिन्यात दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मुंबई शहर हागणदारीमुक्त आहे. याच धर्तीवर मध्य रेल्वेदेखील हागणदारीमुक्त होण्यासाठी 'फास्ट' पावले उचलत आहे. रेल्वे रूळावर पडणाऱ्या मानवनिर्मित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये बायोटोयलेट कार्यान्वित करणार आहे. मध्य रेल्वेच्या ५५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत देशातील सर्व रेल्वे विभागातील लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये एकूण १ लाख ४० हजार बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. हे लक्ष पूर्ण करण्यासाठी २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेल्वे बजेटमध्ये बायोटॉयलेटसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट कार्यान्वित होणार आहे. यापैकी जुलै २०१७ पर्यंत ५५३२ बायोटॉयलेट कार्यान्वित झाल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली.

बायोटॉयलेट विकसित करण्यासाठी रेल्वे आणि डिफेन्स रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांच्यात करार करण्यात आला आहे. यानुसार २०१९ पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून पारंपरिक शौचगृह हद्दपार करण्यात येणार आहे. त्याजागी बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहे. स्टेनलेस स्टिल बनावटीच्या ६ चेंबर्ससहीत बायोटॉयलेटचे संचाचे मूल्य ९० हजार इतके आहे.लांब पल्ल्यांच्या प्रवाशांकडून प्रवासादरम्यान पारंपरिक शौचालयाच्या अनेक तक्रारी मिळत होत्या. बायोटॉयलेटमुळे प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. बायोटॉयलेटमुळे पाण्याचा देखील योग्य वापर होतो. परिणामी पाण्याचे संवर्धन देखील करता येणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.  

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे