२६ सप्टेंबरला मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:50 AM2017-09-09T01:50:16+5:302017-09-09T01:50:21+5:30

अकोला : मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या रेल्वे  सल्लागार समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी आयोजित  करण्यात आली आहे. मंडळ व्यवस्थापक आर.के.  यादव यांच्या मुख्य उपस्थितीत भुसावळ येथे आयोजित  करण्यात आलेल्या या बैठकीला अकोल्यातील  डीआरयूसीसी सदस्य वसंतकुमार बाछुका उपस्थित  राहणार आहेत. 

Meeting of Central Railway Advisory Committee on September 26 | २६ सप्टेंबरला मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक

२६ सप्टेंबरला मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक

Next
ठळक मुद्देअकोला रेल्वे स्थानकाशी निगडित विषयांवर होणार मं थनबैठकीला अकोल्यातील डीआरयुसीसी सदस्य राहणार  उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या रेल्वे  सल्लागार समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी आयोजित  करण्यात आली आहे. मंडळ व्यवस्थापक आर.के.  यादव यांच्या मुख्य उपस्थितीत भुसावळ येथे आयोजित  करण्यात आलेल्या या बैठकीला अकोल्यातील  डीआरयूसीसी सदस्य वसंतकुमार बाछुका उपस्थित  राहणार आहेत. 
मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या  अकोला रेल्वे स्थानकावर अनेक मूलभूत सुविधा उ पलब्ध करून देण्यात आल्या असल्या, तरी त्या अत्यंत  तोकड्या पडत आहेत. या ठिकाणी ज्या मूलभूत  सेवा-सुविधांची गरज आहे, त्या सर्व बाबींकडे मंडळ  प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न २६ सप्टेंबर रोजी  आयोजित बैठकीत करण्यात येणार असल्याची माहिती  बाछुका यांनी ‘लोकमत’ला दिली. यामध्ये प्रवाशांच्या  दृष्टिकोनातून त्रासदायक ठरणार्‍या समस्यांवर मंथन  केले जाणार आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या दर्शनी  भागातील ‘ड्रॉप अँन्ड गो’ लेन सुविधा अतिक्रमणामुळे  कायम बंद असते, फलाट क्रमांक ३ वरील डिस्प्ले बोर्ड  प्रणाली बंद आहे,  दिवसाच्या वेळेस कार पार्किंगमध्ये  गाड्या उभ्या करता येत नाहीत, दादर्‍यावर भिकार्‍यांची  गर्दी, फलाटांवरील पंखे बंद असतात आदींमुळे  प्रवाशांना असुविधा होते. अकोला रेल्वेस्थानकावर  खर्‍या अर्थाने आता सीसी कॅमेरे लावण्याची, तसेच  स्वयंचलित जिने लावण्याची गरज आहे. 
या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी खासदार संजय धोत्रे  यांच्यासह अकोल्यातील मध्य रेल्वे डीआरयूसीसी  सदस्य सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, मध्य रेल्वे  प्रशासनाच्यावतीने केवळ आश्‍वासने दिली जात आहे त. अकोला रेल्वेस्थानकावर या सुविधा नेमक्या केव्हा  उपलब्ध होणार? याबाबत बैठकीमध्ये मंडळ  अधिकार्‍यांना विचारणा केली जाणार असल्याची  माहिती बाछुका यांनी दिली. 
-

Web Title: Meeting of Central Railway Advisory Committee on September 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.