शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळही, मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:53 IST

इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

पुणे : इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आता जन्मतारीखेसोबत जन्मस्थळही झळकणार आहे. परिणामी, यापुढील काळात अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्राला हे दहावीचे प्रमाणपत्र पर्याय ठरू शकते.विविध कामांसाठी जन्मतारखेचा दाखला द्यावा लागतो. मात्र, अनेकांना हा दाखला न मिळाल्यास इयत्ता दहावीचे राज्य मंडळाने दिलेले प्रमाणपत्र त्यासाठी ग्राह्य धरले जाते. या प्रमाणपत्रावर नमूद केलेली जन्मतारीख सर्वच ठिकाणी पुरावा म्हणून मान्यता दिली जाते. शाळेकडे नोंद असलेली ही तारीख प्रमाणपत्रावर येते. त्यामुळे स्वतंत्र जन्मदाखला काढावा लागत नाही. त्याअनुषंगाने आता राज्य मंडळाने प्रमाणपत्रावर जन्मतारखेप्रमाणेच जन्मस्थळ नमूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे विद्यार्थ्यांना जन्मस्थळाचीही नोंद असलेले प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे.प्रमाणपत्रावर जन्मस्थळाची नोंद झाल्यास विद्यार्थ्यांना अधिवासाचा पुरावा म्हणूनही त्याचा वापर करता येऊ शकतो. शाळेमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेबरोबरच स्थळाचीही नोंद केली जाते. त्यानुसार शाळा सोडल्याचा दाखला व इतर कामांसाठी ही माहिती ग्राह्य धरली जाते. एकाच प्रमाणपत्रावर जन्मतारीख व जन्मस्थळाचीही नोंद होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील काळात अधिवास दाखला स्वतंत्रपणे काढण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यता आहे. अधिवास दाखला काढताना जन्मतारीख, जन्मठिकाणाची नोंद असलेले पुरावे सादर करावे लागतात. आता या दोन्ही नोंदी दहावीच्या प्रमाणपत्रावर असल्याने अधिवास प्रमाणपत्र म्हणूनही हे ग्राह्य धरले जावू शकते, अशी चर्चा आहे.दरम्यान, याविषयी माहिती देताना मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, दहावीच्या प्रमाणपत्रावर जन्मस्थळाचीही नोंद केली जाणार आहे. प्रमाणपत्रांवर नमूद जन्मतारीख शाळेत नोंद असलेली असते. तसेच शाळेकडे जन्मस्थळाचीही नोंद असते. तेच ठिकाण प्रमाणपत्रावर नमूद केले जाणार आहे. मार्च २०१७ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना हा बदल केला जाणार आहे. नवीन प्रमाणपत्रावर जन्मतारखेबरोबच जन्मस्थळही नमूद केले जाणार आहे.------------परीक्षा अर्जावर भिन्नलिंगी पर्यायइयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जांवर आतापर्यंत लिंग या रकान्यात केवळ स्त्री व पुरुष असे पर्याय दिले जात होते. मात्र, आता राज्य मंडळाने त्यामध्ये भिन्नलिंगी (ट्रान्सजेंडर) हा पर्यायही दिला आहे. मार्च २०१८ मध्ये होणा-या परीक्षांसाठी भरण्यात येणा-या अर्जांवर पहिल्यांदाच असा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी