शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 14:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात टोपे यांनी माहिती दिली.

मुंबई - राज्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारही सतर्क आहे. यासंदर्भात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हटले, राज्यात सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही. पण ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढेल त्या भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांसंदर्भात विचार करण्यात येईल. याच बरोब, गर्दीच्या ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे आता RTPCR ऐवजी अँटिजन टेस्टवर अधिक भर द्यावा लागणार असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे.

आता क्वारंटाइनचा कालावधीही 7 दिवसांचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यासंदर्भात टोपे यांनी माहिती दिली. आता क्वारंटाइनचा कालावधीही 7 दिवसांचा असणार आहे. क्वारंटाइन असताना लोकांनी नियम पाळणे बंधनकारक आहे. याशिवाय, अँटिजन टेस्ट झाल्यानंतर RCPCR करण्याची गरज नाही. 90 टक्के रुग्णांना तर कोरोनाची लक्षणेही नाहीत. पण असे असले तरीही लोकांनी गर्दी टाळायला हवी. असेही टोपे म्हणाले. 

मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपये दंड -कोरोनाचा धोका वाढल्याने आता मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपये दंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा कंबर कसून कामाला लागले आहेत. तसेच, लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देणेही आवश्यक असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. 

अशी आहे राज्याची स्थिती -राज्यात मंगळवारी तब्बल 18 हजार 466 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचं मुंबई हे केंद्र ठरताना दिसत आहे. मुंबईत आज 10 हजाराहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 4 हजार 558 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 66 हजार 308 सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्यात काल दिवसभरात 75 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 40 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा 653 इतका झाला आहे. यातील 408 रुग्ण मुंबईत आहेत. तर पुण्यात 71 रुग्णांची नोंद आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन